कन्नड, दि. १९ ऑक्टोबर २०२६ : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, कन्नड यांच्या वतीने मा. डॉ. दत्ता देगावकर, वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, ब्राह्मणी येथे विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी व डोळ्यांच्या आरोग्याविषयी समुपदेशन करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना डोळ्यांची स्वच्छता, दृष्टीदोषांची लक्षणे आणि नेत्रआरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी नेत्रचिकित्सा अधिकारी श्री. ज्ञानेश्वर पोटफोडे, श्री. दादासाहेब गायकवाड तसेच शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.
— ग्रामीण रुग्णालय, कन्नड
